Pune : धनकवडीमध्ये भरदिवसा घरफोडी करुन सव्वादोन लाखाचा एेवज लंपास

एमपीसी न्युज – धनकवडी येथील द रिव्हेरी रेसिडेन्सी सहकारी सोसायटीमध्ये चोरट्यांनी घरफोडी करुन रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकुण 2,23,750 रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल सोमवारी (दि 22)सकाळी अकरा ते दोनच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी तृप्ती अब्राहम (वय,39 राहणार धनकवडी,पुणे) यांनी सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा राहता फ्लॅट कुलूप बंद असताना अज्ञात इसमांनी मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. व बेडरुममधील कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 2,23,750 रुपयांचा ऐवज लुटला.

सहायक पोलिस निरिक्षक व्ही.बी कोळी पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.