Nigdi : बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून सव्वा लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज – बंद फ्लॅटचा कडी कोयंडा उचकटून चोरटयांनी घरातील सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चिंचवड स्टेशन जवळ सोमवारी (दि. 1) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली.

आशा अरुण सावदेकर (वय 59, रा. जगन्नाथ कॉम्प्लेक्स, चिंचवड स्टेशन) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशा सोमवारी सकाळी कामानिमित्त फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. दरम्यान, अज्ञात चोरटयांनी फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील 1 लाख 12 हजार रुपये किमतीचे 36 ग्रॅम सोन्याचे दागिने, 10 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 15 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 27 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला. आशा दुपारी तीनच्या सुमारास घरी आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. यावरून त्यांनी तात्काळ निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.