Dehu road : देहुरोड येथे एकाच वेळी दोन घरात घरफोडी

एमपीसी न्यूज – देहुरोड येथे दोन फ्लॅटमध्ये घरफोडी झाली आहे. (Dehu road) ज्यामध्ये 64 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घरफोडी 3 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत देहुरोड येथील दत्तनगर व जवळ असलेल्या आदर्शनगर येथे झाली आहे.

याप्रकरणी पवन वासुदेव शिवणकर (वय 35 रा.देहुरोड) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Chikhali Crime : विवाहितेचा छळ प्रकरणी सात जणांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ रहात असलेला फ्लॅट व त्यांच्या जवळच राहणाऱ्या अंकुश गरगडे यांचे घर बंद असताना आरोपीने घराचा कडीकोयंडा (Dehu road) तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोक रक्कम असा एकूण 64 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. देहुरोड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.