Pimpri : घरफोडी; लॅपटॉप, मोबाईल लांबविला

एमपीसी न्यूज – राहत्या घराचा कडी-कोयंडा उचकटून घरात घुसून चोरट्यांनी घरातील 35 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, मोबाईल आणि कागदपत्रे चोरुन नेली. ही घटना शनिवारी (दि. 25) सकाळी दहा ते रात्री आठ यावेळेत पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी रुपाकुमारी ललन तिवारी (वय 33, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तिवारी यांचे घर शनिवारी सकाळी सव्वा सहा ते रात्री आठ या वेळेत बंद होते. चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा उचकटून घरात घुसून घरातील 35 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, मोबाईल आणि कागदपत्रे चोरुन नेली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.