Thergaon : थेरगावात भरदिवसा तीन तासात सुमारे तीन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – थेरगाव येथे खिडकीतून दरवाज्याची (Thergaon) कडी काढत घरातील दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा तब्बल 2 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.20) दुपारी साडे तीन ते साडे सहा या तीन तासाच्या कालावधीत थेरगाव येथील नम्रता हाऊसींग सोसायटी येथे घडला.

याप्रकऱणी संदिप गजानन पांचाळ (वय 34 रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Dapodi : माहेरी गेलेल्या पत्नीला आणयला गेलेल्या पतीला मेहुण्याकडून कोयत्याने मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचे आरोपींनी दुपारी खिडकीद्वारे दरवाज्याची आतून लावलेली कडी काढून घरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी हॉलमध्ये ठेवलेल्या लाकडी कपाटातील लॉकर मधून 2 लाख 88 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, 2 हजार रुपयांचा मोबाईल व रोख रक्कम 5 हजार रुपये असा एकूण 2 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

चोरीची (Thergaon) घटना उघडकीस येताच फिर्यादी यांनी वाकड पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावरून गुन्हा दाखल झाला असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.