Chikhali : घरफोडी; पार्किंगमधील मोटारही पळवली

एमपीसी न्यूज –  बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी शयनगृहातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने असा 22 हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच घरातील मोटारीची चावी घेऊन पार्किंगमधील मोटार चोरून नेली. ही घटना चिखली येथे नुकतीच उघडकीस आली.

दिपककुमार सुरेशकुमार गुप्ता (वय 35, रा. डायमंड व्हिला सोसायटी, शिवाजीनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांचे 18 ते 23 जानेवारी या कालावधीत घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाटातील 22 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मोटारीची चावी चोरली. सोसायटीच्या पार्किंगमधील 50 हजार रूपये किमतीची वॅगनआर मोटार चोरून नेली. फौजदार घुगे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.