Wakad : काळेवाडी येथे घरफोडी; 25 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – काळेवाडी येथील नढेनगर परिसरात घराचा कडी कोंयडा तोडून घरफोडी केल्याची घटना 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान घडली आहे.

स्मिता राजेश गुप्ता (वय-30 रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे कुटुंब दिवाळी निमीत्त बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलुप तोडून घरातील 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.याचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.