-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : भारती विद्यापीठ, चंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घरफोड्या, चार लाखांचा ऐवज लंपास

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : पुण्यातील भारती विद्यापीठ आणि चंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या दोन घरफोड्या मध्ये चोरट्यांनी तब्बल तीन लाख 85 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव बुद्रुक मध्ये सुमन संकल्प बिल्डींग मधील फ्लॅट नंबर 401 मध्ये जबरी चोरी झाली. याप्रकरणी सागर दादासो खेडेकर (वय 31) यांनी तक्रार दिली आहे. दादासो यांचा फ्लॅट कुलूप बंद असताना अज्ञात आरोपींनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील तीन लाख 33 हजार रुपये किमतीचे 59 ग्रॅम सोने चोरून नेले आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदन नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील खराडी बायपास येथील कांचन कॉम्प्लेक्स या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर चोरी झाली. याप्रकरणी नवनाथ साळबा कुलाळ (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी कुलाळ यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत 52 हजार रुपये किमतीचे 12 सोने आणि चांदी असा मुद्देमाल चोरून नेला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.