Chinchwad : संभाजीनगर येथे संभाजी उद्यानासमोर बर्निंग कारचा थरार

एमपीसी न्यूज – रस्त्यात धावत्या कारने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना संभाजीनगर येथे शनिवारी (दि. 9) रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली.

या घटनेत कारच्या समोरील भाग जाळला असून आर्थिकहानी अधिक झाली आहे. मात्र ही आग कशी लागली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे.

अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संभाजी नगर येथील संभाजी उद्यानासमोर शनिवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास एका धावत्या कारने (एमएच 14 / बीआर 5511) पेट घेतला. ही बाब लक्षात येताच चालकाने कार बाजूला घेतली. घटनेची माहिती मिळताच चिखली आणि प्राधिकरण उपकेंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले. 15 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी बघ्यांनी एकाच गर्दी केली होती. सध्या आगीच्या घटना घडत असून याबाबत योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे सांगितले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.