Ozarde : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बस व कंटेनरचा अपघात; बसचालक ठार, 5 जखमी

एमपीसी न्यूज – पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर ओझर्डे गावच्या हद्दीत बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवासी बस आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात बसचालक जागीच ठार तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा विचित्र अपघात बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारासओझर्डे (ता.मावळ)गावच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक ८० येथे झाला.

दशरथ कोंडीबा पानघर (वय ५०,रा.चांदगड,कोल्हापूर), असे अपघातात ठार झालेल्या बस चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडे जाणा-या खाजगी आराम बसने (क्र.केए४२-ए ५६०७) पुढे जात असलेल्या एका कंटेनरला (क्र. आरजे ०२ जी.बी.६१३६) पाठीमागून जोरात धडकली. यात बसचालक जागीच ठार झाला तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. महामार्ग पोलिसांनी जखमींना तातडीने अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढून निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like