Bus fire near Saptashrungi Gad: नाशिकपाठोपाठ आता वणी येथेही घडली बस पेटल्याची घटना

एमपीसी न्यूज : नाशिकमध्ये आज पहाटे बसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच अजून एक बसला आग लागल्याची घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. ही घटना नाशिकजवळच असलेल्या वणी येथे घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, सध्या नवरात्रीनिमित्त यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी प्रवाशांनी भरलेली बस सप्तशृंगी गडावर निघाली होती. दरम्यान, गडावर जात असताना अचानक बसला आग लागली. बसला आग लागली आहे ही वेळीच लक्षात आल्यामुळे प्रवाशांनी बसबाहेर उडया मारल्या. तसेच स्थानिक नागरीक आणि गडावरील रोपावेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत वेळीच बचावकार्य सुरू केले. यामुळे प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

या घटनेमध्ये बस ही पूर्णपणे जाळून खाक झाली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.