_MPC_DIR_MPU_III

 Pimpri: बीआरटी मार्गावर बस बंद पडण्याचे सत्र सुरुच; चिंचवड, आकुर्डीत बस बंद

एमपीसी न्यूज – निगडी- दापोडी बीआरटी मार्गावरील बस बंद पडण्याचे सत्र सुरुच आहे. आज (सोमवारी) निगडीवरून पुण्याच्या दिशेने जाणा-या दोन पीएमपीएमएल बस बीआरटी मार्गावर बंद पडल्या. आकुर्डीतील बजाज अॅटो समोर आणि चिंचवड स्टेशन येथे बस बंद पडल्या आहेत. यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून बीआरटी मार्गच बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस मार्गावर आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 24 ऑगस्ट 2018 रोजी बस धावली. परंतु, मार्ग सुरु झाल्यापासून बस बंद पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. बंद पडलेली बस बाहेर काढण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे बस बंद पडल्यावर प्रवाशांना  मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बीआरटी मार्ग बंदच बरा होता, अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

निगडीवरुन पुण्याच्या दिशेने जाणा-या दोन बस आज सोमवारी मार्गात बंद पडल्या. आकुर्डीतील बजाज अॅटो समोर एक बस बंद पडली. तर, चिंचवड स्टेशन येथे देखील मध्येच बस बंद पडली होती. मार्गातील बस बाहेर काढण्यासाठी दोन तासाचा अवधी लागला. त्यामुळे मार्ग बंद ठेवण्यात आला होता. यापूर्वी पाच ते सहा वेळा या मार्गावर बस बंद पडल्यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा पाहायला मिळाला. प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला तो वेगळाच. एक तर या मार्गावरून बस सोडू नका अथवा पीएमपीएमएल बसची अवस्था सुधारा अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासीवर्गाकडून व्यक्त होत आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.