पुंबईमधील अभिमान टाऊनशिप म्हणजे आधुनिकता व सोय यांचा सुंदर संगम

बांधकाम व्यवसायात अग्रगण्य असलेल्या कोहिनूरतर्फे आपणांस गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

एमपीसी न्यूज- दिलेल्या वेळेत किंबहुना त्यापूर्वीही प्रकल्प पूर्ण करण्याचा नावलौकिक असलेला कोहिनूर समूह, पुण्यातील बांधकामक्षेत्रातील एक आघाडीचं नाव आहे. चेअरमन आणि डायरेक्टर श्री. कृष्णकुमार गोयल तसेच जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर्स श्री. विनीत गोयल आणि श्री. राजेश गोयल यांचे खंबीर नेतृत्त्व आणि मार्गदर्शनाखाली कोहिनूरने आतापर्यंत सुमारे 40 लाख स्क्वेअर फूट बांधकाम 5000 आनंदी ग्राहकांसाठी पूर्ण केले आहे.

कोहिनूरमध्ये आमची ठाम श्रद्धा आहे की घर म्हणजे चार भिंतींपेक्षा बरंच काही असतं. आमच्या या श्रद्धेनुसार घर असतं मायेची ऊब, प्रेम, एकत्रितपणा आणि आनंद यांचा संगम. हेच कारण आहे की आम्ही केवळ राहण्याची जागा तयार करत नाही तर आयुष्यभराच्या आनंदाची निर्मिती करतो. कोहिनूरच्या या घरात सदा सुखी रहा.

गेल्या तीन दशकांचा बांधकाम क्षेत्रातील अनुभव, पारदर्शकता, वचनबद्धता आणि प्रामाणिकपणा यांसाठीचा नावलौकिक यांच्या बळावर कोहिनूरने आतापर्यंत 7 लाख स्क्वे. फुटांचे व्यावसायिक प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. भविष्यकाळात आणखी 20 लाख स्क्वे. फुटांचे काम पूर्ण करण्याच्या दिशेने ते अग्रेसर आहेत. ‘सदा सुखी रहो’ हे त्यांचं ब्रीदवाक्य असल्याने आपल्या ग्राहकांना रहिवासाचे सुखसमाधान कायम मिळत राहील याला कोहिनूर प्राधान्य देतात.

आज तब्बल 30 वर्षे आणि 28 प्रकल्पांच्या निर्मितीनंतर प्रकर्षाने जर काही झळकत असेल तर तो कोहिनूरचा नावलौकिक. सध्याच्या कामांची गती आणि भविष्यातील प्रकल्पांचा अंदाज घेता, कोहिनूर साधारणपणे 20,000 घरे येत्या काही वर्षांत हस्तांतरित करतील यात शंका नाही.
कोहिनूरचा प्रत्येक प्रकल्प, मग तो रहिवासी असो अथवा व्यावसायिक, पुण्याचा लखलखता कोहिनूर शोभेल असाच असतो!

मुंबई व पुण्याला जोडणा-या द्रुतगती महामार्गानजीकच म्हणजे पुंबईमध्ये कोहिनूर ग्रुपचा अभिमान टाऊनशिप हा प्रकल्प म्हणजे आधुनिकता आणि सोय यांचा सुंदर समन्वय आहे. प्रतिशिर्डी शिरगाव येथे साई मंदिरापासून जवळ असलेला हा प्रकल्प सुमारे बावीस एकरांवर वसलेला आहे. उत्कृष्ट संरचना, अत्यंत वाजवी किंमत असलेल्या या टाऊनशिपमध्ये एक व दोन बीएचके सदनिका उपलब्ध आहेत. उत्कृष्ट टाऊनशिपची सर्व वैशिष्ट्ये येथे आहेत. येथे लहान दुकांनासाठी देखील जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांनादेखील चांगली मागणी आहे.

पुंबई म्हणजे व पुणे व मुंबईचा मध्यभाग. ही टाऊनशिप द्रुतगती महामार्गापासून अगदी जवळ आहे. तसेच लोहमार्गाशी देखील जोडलेली आहे. याशिवाय हिंजवडी, चाकण, तळेगाव, पुणे, आकुर्डी, औंध, तळवडे या परिसरातील शहरांशी रस्त्याने जोडलेली आहे. या भागात अनेक नामवंत शैक्षणिक संस्था आहेत. सिंबायोसिस, लोटस बिझनेस स्कूल, किर्लोस्कर इन्स्टिस्टूट ऑफ अॅडव्हान्स मॅनेजमेंट याशिवाय इतरही शाळा व महाविद्यालये या परिसरात आहेत. चिंचवड येथील आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालय देखील येथून जवळ आहे. त्यामुळे वेगाने विकसित होणारे पुण्याचे प्रवेशद्वार म्हणजे पुंबई असे म्हटले तर वावगे होणार नाही. म्हणूनच अभिमान टाऊनशिपमध्ये घर घ्या आणि निर्धास्त व सुखासमाधानाचे आयुष्य व्यतीत करा.

पत्ता – गट नं. 8 & 12, शिरगाव, सोमाटणे फाटा, प्रतिशिर्डी साईबाबा मंदिरासमोर,
सोमाटणे कासारसाई रोड. शिरगाव, महाराष्ट्र – 412402

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.