Talegaon : भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादितच्या चेअरमनपदी उद्योजक रामनाथ मारूती कलवडे बिनविरोध

0

एमपीसी न्यूज – आंबी (मावळ) येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादितच्या चेअरमनपदी उद्योजक रामनाथ मारूती कलवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर स्मिता संजय हिरवे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली. 

या आधीचे चेअरमन भगवान शिंदे (सर) यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. रिक्त झालेल्या चेअरमनपद निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून व्ही पी खोतकर यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि 14) सकाळी 11 वा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वडगाव मावळ या कार्यालयात विशेष सभा झाली. रामनाथ कलवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. पी. खोतकर यांनी त्यांची चेअरमनपदी निवड जाहीर केली.

याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक, सभासद, मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या निवडीमुळे पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण तालुकाभर अभिनंदन! व कौतुक होत आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like