_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Bopkhel News : बलात्कार करून, ‘पतीला सोडचिठ्ठी देऊन दुसरे लग्न करण्याचे ‘ लिहून घेतले हमीपत्र

एमपीसी न्यूज – विवाहितेला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. तसेच आपण नवऱ्याला सोडचिठ्ठी देणार असून दुसरे लग्न करणार असल्याचे हमीपत्र धमकावून लिहून घेतले. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दोन महिन्यांपूर्वी बोपखेल येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

सलमान नूरआलम शेख (वय 30, रा. सिद्धार्थनगर, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडित विवाहितेने गुरुवारी (दि. 13) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये फिर्यादी पिडित महिला आणि आरोपी सलमान याची कामाच्या ठिकाणी ओळख झाली. त्यावेळी आरोपी फिर्यादी यांच्या घराजवळच्या परिसरात राहत होता. त्याने पिडित महिलेशी ओळख वाढविली. ‘तू मला आवडतेस. मी तुझ्याशी लग्न करणार आहे. तू नवऱ्याला सोडचिठ्ठी दे. नाहीतर मी तुझ्या नवऱ्याला आणि मुलाबाळांना सोडणार नाही. त्यांना खल्लास करून टाकेल,” अशी धमकी सलमान याने दिली.

दोन महिन्यांपूर्वी फिर्यादी विवाहिता घरात एकट्याच असताना आरोपी तिथे आला. त्याने विवाहितेवर लैंगिक अत्याचार केले. फिर्यादी विवाहितेने आपल्याशी लग्न करावे यासाठी आरोपी सलमान हा फिर्यादी यांना एका वकीलाकडे घेऊन गेला. ‘आपला नवरा मारहाण करतो, पैसे मागतो’, असे वकीलांना स्वतःच्या हस्तक्षरात स्टॅम्प पेपरवर हमीपत्र लिहून देण्यास आरोपी सलमान याने भाग पाडले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.