Nagpur Crime : बनावट पावत्या सादर करून, 35 कोटींचा गैरव्यवहार

एमपीसी न्यूज – आयटीसी म्हणजेच ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ या वस्तू आणि सेवा कर भरण्यासाठी दिलेल्या सवलतीच्या आधारे 3.51 कोटी रूपयांच्या बनावट पावत्या सादर करून 35 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार करणाऱ्या ट्रेडिंग फर्मच्या मालकाला डीजीजीआयच्या नागपूर विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आज अटक केली. या फर्मच्या माध्यमातून पेंट, सिमेंट, लोखंड आणि स्टील उत्पादनांचे व्यवहार करण्यात येत होते. 

या संदर्भामध्ये मिळालेल्या माहितीनुसार डीजीजीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आणि कागदपत्रांची छाननी केल्यानंतर गैरव्यवहार होत असल्याचे दिसून आले.

एका छपाई कारखान्यातून ज्या कंपन्या अस्तित्वातच नाहीत, अशा कंपन्यांच्या नावाचे अधिक रकमेचे बनावट देयके तयार करून हा गैरव्यवहार केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. फर्मच्या मालकाने प्रारंभीच्या चौकशीमध्ये आपल्या या गैरव्यवहाराशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र संबंधित कागदपत्रांचा तपशील तपासल्यानंतर गैरव्यवहार उघडकीस आला. त्यातूनच अटक करण्यात आलेली व्यक्तीच बनावट ट्रेडिंग कंपनी चालवत असल्याचे सिद्ध झाले.

या ट्रेडिंग कंपनीने एकूण बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेतला आणि तसाच यापुढच्या व्यवहारकर्त्यांनी बनावट पावत्यांचा आधार घेऊन व्यवहार केले. संगणक प्रणालीमध्ये 3.51 कोटींच्या आयटीसींची नोंद आहे. प्रत्यक्षात 2.75 कोटींच्या आयटीसी आहेत. या प्रकरणामध्ये सखोल चौकशी केल्यानंतर लक्षात आले की, छत्तीसगड मध्ये अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावे बनावट पावत्या तयार करून फायदा घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.