Bye-Election : कसबा, चिंचवडची निवडणूक ‘मविआ’ एकत्रित लढणार; उद्या उमेदवार जाहीर होणार

एमपीसी न्यूज – पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची (Bye-Election) पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. उद्या (शनिवारी) उमेदवारांची घोषणा केली जाईल, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात आज तिन्ही पक्षांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांची उपस्थिती होती. त्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत उद्या उमेदवार जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले.

Alandi : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील माऊली बागेच्या वर्धापना दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गटाने कसबा, चिंचवड पोटनिवडणूक एकत्रितपणे (Bye-Election) लढण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा करण्यात आली आहे. तसेच उद्या कोणती जागा कोणाला दिली जाणार, याबाबत घोषणा केली जाणार आहे. या पोटनिवडणुका एकजुटीने लढण्याचा निर्धार तीनही पक्षांनी केला आहे. आता महाविकास आघाडीत कसबा पेठ कोणत्या पक्षाला आणि चिंचवड विधानसभा मतदारंसघ कोणत्या पक्षाला मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.