Bye Election : ज्यांनी मुक्ता टिळकांच्या मरणाची वाट पाहिली भाजपकडून त्यांनाच उमेदवारी – अरविंद शिंदे

एमपीसी न्यूज-  मुक्ता टिळक आजारी असताना भाजपमधील अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी जात होते. त्याचवेळी भाजपमधील (Bye Election) काही लोक मात्र मुक्ता टिळक यांच्या मरणाची गिधाडासारखी वाट पाहत होते अशी जहरी टीका पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी अरविंद शिंदे यांनी हेमंत रासने यांच्यावर कठोर शब्दात टीका केली.

अरविंद शिंदे म्हणाले, मुक्ता टिळक अडीच वर्ष आजारी होत्या. यावेळी त्यांना भेटण्यासाठी अनेक जण जात होते. मात्र भाजप मधीलच काही इच्छुक त्यांच्या मरणाची गिधाडासारखी वाट बघत होते. मुक्ता टिळक यांनी सुचवलेल्या विकास कामाला हेच हेमंत रासने विरोध करत होते.

मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनीच हे आपल्याला सांगितले असल्याचे अरविंद शिंदे म्हणाले. मात्र भाजपकडून तरीही ज्याने मुक्ता टिळक (Bye Election) यांच्या मरणाची वाट पाहिली त्यालाच उमेदवारी देण्यात आली. यांना लाज वाटली पाहिजे असे म्हणत शिंदे यांनी कठोर टीका केली.

Pune News : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

अरविंद शिंदे पुढे म्हणाले हेमंत रासने हे चार वेळेस स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. या चार वर्षात त्यांनी तब्बल 28 हजार कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे. या कालावधीत त्यांनी आपल्या प्रभागात विकास कामांसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली मात्र अजूनही त्या ठिकाणी विकासाची कामे झालेच नाहीत.

त्यामुळे कधीतरी (Bye Election) हेमंत रासने यांच्या घरी सीआयडी, ईडी, आयकर विभाग यांनी धाडी टाकाव्यात. 500 कोटी रुपयांचे त्यांनी काय केले असा सवाल त्यांना विचारावा असे देखील शिंदे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.