Bye-Election : ‘व्होटर स्लीप’ पाहिजे ‘या’ नंबरवर संपर्क साधा, अपना वैश्य समाज संघटनेचे आवाहन

एमपीसी न्यूज – पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या (Bye-Election) पोटनिवडणुकीसाठी उद्या (रविवारी) मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक विभागामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. अपना वैश्य समाज संघटनेकडूनही जनजागृती करण्यात येत असून ज्या मतदारांना ‘व्होटर स्लीप’ पाहिजे असेल. त्यांनी 9370384033 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन सुधीरकुमार अग्रवाल यांनी केले.

कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांमार्फत मतदारांना घरपोच व्होटर स्लीप वाटप केल्या जात आहेत. विविध समाज संघटनांकडून मतदान वाढीसाठी जनजागृती केली जात आहे.

Nigdi News: ‘एसआरए’चा दुर्गानगर, शरदनगर येथील झोपडपट्टीचा सर्व्हे बनावट – मनोज गायकवाड

अपना वैश्य समाज संघटनेचे (Bye-Election) अध्यक्ष सुधीरकुमार अग्रवाल म्हणाले, मतदान हा प्रत्येकाचा संविधानिक अधिकार आहे. मतदान वाढीसाठी सातत्याने जनजागृती केली जाते. त्यासाठी व्होटर स्लिप घरोघरी वाटल्या जात आहेत. काही कारणामुळे कसबा आणि चिंचवडमधील मतदाराला व्होटर स्लिप मिळाली नसेल.

तर, ती दिली जाईल. ज्यांना व्होटर स्लिप पाहिजे, त्यांनी 9370384033 या नंबरशी संपर्क साधावा. मतदान केंद्र, अनुक्रमांकाची माहिती दिली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.