Bye-Election : भाजपचे उमेदवारी मिळालेले अश्विनी जगताप आणि हेमंत रासने कोण? जाणून घ्या

एमपीसी न्यूज : भाजपने आज पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार (Bye-Election) जाहीर केले आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवडसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी का भाऊ अशी रस्सीखेच असताना लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली, तर कसब्यामध्येही चिंचवडप्रमाणे घरात उमेदवारी दिली जाईल अशी अपेक्षा असताना अचानक हेमंत रासने यांचे आलेले नाव सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे होते. तर, यामुळे जाणून घेऊया अश्विनी जगताप आणि हेमंत रासने कोण आहेत?

अश्विनी जगताप –

अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी. त्यांची केवळ इतकीच ओळख नसून त्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या कन्या देखील आहेत. त्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रगती प्रतिष्ठान देखील चालवतात. या मार्फत त्यांनी महिलांच्या (Bye-Election) विकासासाठी बचत गटाचे मोठे जाळे विणले आहे. आतापर्यंत पतीच्या मतदानासाठी प्रचार करणाऱ्या अश्विनी जगताप स्वत: साठी प्रचार करणार आहेत.

Kasba Bye Election : हेमंत रासने यांना भाजपची उमेदवारी जाहीर

हेमंत रासने – 

शैलेश टिळक यांचे नाव चर्चेत असताना देखील भाजपने अचानक हेमंत रासने यांचे नाव जाहीर करण्यामागे रासने यांचा पुण्याच्या विकासात असलेले योगदान हे कारण आहे. ते पुणे महानगर पालिकेचे भाजपचे नगरसेवक आहेत. ते दोनदा  स्थायी समितीचे अध्यक्ष देखील होते. तर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे विश्वस्त देखील आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.