Bye-Election : निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांचे ‘रँडमायझेशन’

एमपीसी न्यूज – कसबा विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल, एस.सत्यनारायण आणि (Bye-Election) कसबा विधानसभा मतदारसंघाचे पोलीस निरीक्षक अश्विनीकुमार सिन्हा यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी जिल्हाधिकारी  डॉ.राजेश देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी सुभाष भागडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरवले आदी उपस्थित होते.

Pimpri News : शहरात ‘जागरुक पालक सुदृढ बालक’ अभियान

एकूण  1 हजार 586 बॅलेट युनिट, 1 हजार 539 कंट्रोल युनिट आणि 1 हजार 542 व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली.(Bye-Election) यापैकी  338 बॅलेट युनिट,  338 कंट्रोल युनिट आणि 351 व्हीव्हीपॅट कसबा पेठ मतदारसंघासाठी आणि 638 बॅलेट युनिट,  638 कंट्रोल युनिट आणि 663  व्हीव्हीपॅट यंत्र चिंचवड मतदारसंघासाठी वितरित करण्यात येतील.

सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.