Pune: CA अभय शास्त्री यांची ‘लायन्स’च्या प्रांतपालपदी निवड

CA abhay shastri elected as a lions club international district 3234 D2 Governor

एमपीसी न्यूज- लायन्स क्लब इंटरनॅशल डिस्ट्रिक्ट 3234 D2 संस्थेच्या प्रांतपालपदी सीए अभय शास्त्री यांची निवड झाली आहे. प्रथम उपप्रांतपाल म्हणून हेमंत नाईक, तर द्वितीय उपप्रांतपाल म्हणून राजेश कोठावदे यांची निवड झाली आहे.

विद्यमान प्रांतपाल उद्योजक ओमप्रकाश पेठे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पार पडलेल्या या परिषदेत निर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकारी जुलै 2020 ते जून 2021 या कालावधीसाठी क्लबच्या पदावर कार्यरत राहणार आहेत.

दरम्यान, या नवनिर्वाचित कार्यकारिणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच ब्रह्मकुमारी सुनीता दीदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टचे (CIRT) संचालक राजेंद्र सानेर पाटील हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.