Pune News : शेळ्या-मेंढ्या चारणाऱ्या आई-वडिलांबरोबर फिरून शिक्षण घेतलं, आता CA झाला; सक्सेस स्टोरी सुप्रिया सुळेंनी थेट लाईव्ह केली

एमपीसी न्यूज : शेळ्या मेंढ्या चारणाऱ्या आई-वडिलांबरोबर रानोमाळ हिंडत शिक्षण घेत बारामती तालुक्यातील एक तरुण आता CA झाला. अतिशय बिकट परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या या तरुणाची बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. (Pune News) या तरुणाची यशोगाथा ऐकून सुप्रिया सुळे यांनी या तरुणाची सक्सेस स्टोरी आपल्या फेसबुक वर चक्क लाईव्ह केली. आणि त्यानंतर या तरुणावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जातोय. लालासाहेब धायगुडे असे या तरुणाचे नाव आहे.

खासदार सुप्रिया सुळे या आपल्या मतदारसंघात चांगल्याच ऍक्टिव्ह असतात. मतदार संघातील गावागावात त्या भेटी देत असतात. मतदारांशी संवाद साधत असतात. दोन दिवसांपूर्वी त्या बारामती तालुक्यातील पळशी गावात होत्या. त्यांच्या या दौऱ्यात लालासाहेब धायगुडे या तरुणाचा सत्कार करण्यात आला. इतकीच नाही तर सुप्रिया सुळे यांनी या तरुणाची सक्सेस स्टोरी आपल्या फेसबुक वर शेअर केली. आणि लालासाहेब धायगुडे यांनी लाईव्ह आपला संघर्ष सांगितला. आपल्या खरंतर यशाची कहाणी सांगितली.

Pune News : सारसबागेत बेवारस बॅग, बॉम्बच्या अफवेने खळबळ

लालासाहेब यांचे प्राथमिक शिक्षण लोणी भापकर येथील जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेत आणि त्यानंतर माळेगावच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळात शिक्षण झाले.. पुढील शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले आणि त्यांनी आता सीए होण्याचा बहुमान मिळवला.(Pune News) विशेष म्हणजे लालासाहेब यांचे आई-वडील आजही मेंढी पालन करतात.. यावेळी बोलत असताना लालासाहेब यांनी आता गावातील मुलांना सीए होण्यासाठी मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितलं.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा तरुण माझ्या मतदार संघातील असल्यामुळे माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. लालासाहेब यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवले आहे. त्यांच्यासारख्या मेहनती आणि हुशार नागरिकांमुळेच बारामती मतदारसंघाचा लौकिक आज देशपातळीवर वाढला आहे असे सांगत त्यांनी पळशी गावाचाही गौरव केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.