Chakan News : बिग बास्केट कंपनीच्या गोडाऊनमधून तरुणाने चोरल्या 15 हजारांच्या कॅडबरी

0

एमपीसी न्यूज – बिग बास्केट कंपनीच्या म्हाळुंगे येथील गोडाऊन मधून एका 19 वर्षीय तरुणाने 15 हजार 843 रुपयांच्या कॅडबरी चोरल्या. हा प्रकार शुक्रवारी (दि. 8) पहाटे पाच वाजता घडला.

अजय संतोष चव्हाण (वय 19, रा. जाधववाडी, चिखली) असे चोरी करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वशीम तयबली शेख (वय 34, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे बिग बास्केट कंपनीत एच आर मॅनेजर पदावर काम करतात. त्यांच्या कंपनीचे खेड तालुक्यातील म्हाळुंगे येथे गोडाऊन आहे. त्या गोडाऊन मध्ये उघड्या दरवाजातून आरोपी अजय याने शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास प्रवेश केला. गोडाऊनमधून 15 हजार 843 रुपये किमतीच्या नेसले, डेअरीमिल्क, अमूल कंपनीच्या कॅडबरी चोरून नेल्या. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.