Pune : शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात असून इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन कर्ज मागणी अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Pimpri : सायबर गुन्ह्यांबाबत तक्रारीसाठी विलंब नको
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी परदेशात उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणारे इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी पात्र आहेत. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन इत्यादी उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेत संपूर्ण कर्ज संबंधित बँकेचे राहणार आहे. विद्यार्थ्याने बँकेच्या कर्जाची परतफेड नियमितपणे केल्यास कमाल 12 टक्के पर्यतची व्याज परतावा रक्कम दर महिन्याला महामंडळ लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. अर्ज भरतांना संकेतस्थळावर शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना हा पर्यायाची निवड करुन कर्ज मागणी अर्ज भरावा. अर्जासोबत मूळ कागदपत्रे अपलोड करावीत.
अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्र. बी. स.नं. 104/105, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे (Pune) – 6. दूरध्वनी क्रमांक 020-29523059 येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक धमेंद्र काकडे यांनी केले आहे.