Pre-Matric Scholarship Scheme : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरण्याबाबत आवाहन

एमपीसी न्यूज : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्याक समाजातील इयत्ता १ली ते १० वी वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती (Pre-Matric Scholarship Scheme) योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी मधील फक्त मुलींसाठी असलेली बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन विद्यार्थीनींचे ऑनलाईन अर्ज ३० सप्टेंबरपूर्वी भरण्याचे आवाहन केले.

PCMC News: मालमत्ता नोंदणीचा आलेख वाढला! शहरात 5 महिन्यांत 11, 272 नव्या मालमत्तांची नोंद

मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांनी www.scholarship.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावे, असे आवाहन शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.