Pune News : राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.यावर्षी हा दिवस‘सर्वसमावेशक आणि तंदुरुस्त समाजासाठी सक्षम म्हणून क्रीडा’ या संकल्पनेवर आधारित साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

क्रीडा संस्कृतीची जोपासना व नागरिकांमध्ये क्रीडाविषयक वातावरण निर्माण करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो.यावर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे व्यापक स्वरुपात आयोजन करण्याबाबत शाळा, संस्थांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार संस्था, शाळांमध्ये प्रभात फेरी, रॅली काढणे, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, क्रीडा विषयक प्रचार व प्रसारासाठी सहाय्यभूत ठरतील अशा उपक्रमाचे आयोजन, राज्याचे क्रीडा धोरण, क्रीडा विषयक परिसंवाद, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र, आहारशास्त्र यांचे महत्व समजावून सांगणे, व्यवसायिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम घेणे, चर्चासत्र, व्याख्यान, क्रीडा प्रदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

स्वांतत्र्यदिनाचा अमृत महोत्सव निमित्त 29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत‘फिट इंडिया फ्रीडम रन’ ही चळवळ, उपक्रम राबविण्यात यावा.अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे दुरध्वनी 020 – 26610194 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.