Chinchwad News : नियंत्रण कक्षात फोन करून पोलिसांना शिवीगाळ

0

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून एका व्यक्तीने पोलिसांना शिवीगाळ केली. हा प्रकार 23 ते 28 एप्रिल या कालावधीत घडला. याबाबत एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

9325191654 या क्रमांकावरून फोन करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस कर्मचारी महिला पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षात  कार्यरत आहेत. 23 एप्रिल रोजी रात्री 9 ते 28 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या कालावधीत आरोपीने  9325191654 या क्रमांकावरून पोलीस नियंत्रण कक्षात वारंवार फोन केला.

फिर्यादी पोलीस महिला आणि नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना आरोपीने शिवीगाळ केली. तसेच फोन एंगेज ठेवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment