Pune : मोठे ध्वज उभे करण्यासाठीचे प्रस्ताव रद्द करा ; आम आदमी पार्टीची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मोठे ध्वज उभे करण्यासाठीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. हे प्रस्ताव रद्द करण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावेळी पुणे विभाग अध्यक्ष मुकुंद किर्दत, कसबा अध्यक्ष चंद्रकांत पानसे, संघटन मंत्री डॉ. अभिजित मोरे उपस्थित होते.

महापालिकेच्या स्थायी समितीत दि. 10 डिसेंबरला नगरसेवकांच्या मागणीवरून लाखो रुपये खर्च करून वार्ड लेव्हलला उंच ध्वज उभे करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. जनतेच्या कष्टाच्या पैशाचा असा अपव्यय करण्यास मनाई करावी, अशीही मागणी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.