BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: ‘परदेश दौ-यावर करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करु नका’

स्मार्ट सिटी संचालकांचा स्पेन दौरा रद्द करा; सामाजिक कार्यकर्ते भापकर यांची मागणी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिका-यांनी परदेश दौ-यावर जाऊन करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करु नये. परदेश दौ-याची फलनिष्पती शुन्य असते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे पदाधिकारी, अधिकारी यांचा स्पेनचा दौरा रद्द करण्यात यावा.  करदात्यांच्या 20 लाख 21 हजार रुपयांची बचत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. 

विरोधी पक्षात असताना भाजपचे पदाधिकारी परदेश दौ-याला विरोध करत होते. महापालिका निवडणुकीत भय व भ्रष्टाचार मुक्त महापालिका असा नारा देत सत्तांतर झाले. भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले. महापालिकेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक करू त्याच प्रमाणे करदात्या नागरिकांच्या पैश्याचा अपव्यय होऊ नये म्हणून महापालिकेच्या खर्चात बचत व्हावी. या उद्देशाने काही पदाधिका-यांनी महापालिकेचे वाहन, मोबाईल वापरणार नाही असे सांगत कामकाजाला सुरुवात केली. परंतु, परदेश दौ-यांवर पैशांची उधळपट्टी सुरुच आहे.

मागील दोन वर्षांत देशात गुजरात, दिल्ली, एक विदेश दौरा व आता स्पेन दौ-यावर पदाधिकारी जाणार आहेत. या दौ-यांवर करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. तत्कालीन पदाधिका-यांनी अभ्यास दौ-यांच्या नावा खाली अनेक देश-विदेश अभ्यास दौरे काढले. परंतु, याची फलनिष्पती शून्य आहे. विरोधी पक्षात असताना भाजपने दौ-याला विरोध केला होता. आंदोलने होत होती. आता सत्तेत आल्यानंतर भाजपलाच आपल्या भुमिकेचा विसर पडल आहे, असे भापकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच हा परदेश दौरा रद्द करावा, या मागणीचे निवेदन महापौर राहुल जाधव यांना देण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3