Lonavala : 370 कलम रद्द झाल्याने मावळचे व महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत – अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द झाल्याने मावळचे व महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी भाजपा शिवसेना महायुतीच्या सरकारवर टीका केली.

मावळातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांच्या प्रचारसभेसाठी खासदार कोल्हे लोणावळ्यात आले होते.

त्यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री मदन बाफना, उमेदवार सुनील शेळके, माजी आमदार कृष्णराव भेगडे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, स्वाभिमानी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, बाळासाहेब ढोरे, कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, काँग्रेस आयचे प्रदेश प्रांतिक सदस्या दत्तात्रय गवळी, प्रदेश सचिव नारायण आंबेकर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, किरण गायकवाड,  काँग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड, महिलाध्यक्ष मंजुश्री वाघ, गणेश खांडगे, कृष्णा दाभोळकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, स्वाभिमानी रिपाईचे शहराध्यक्ष बाबा ओव्हाळ, नारायण पाळेकर, विठ्ठलराव शिंदे, यादवेंद्र खळदे, अनिल मालपोटे, संतोष भेगडे, रुपालीताई दाभाडे, राजू बोराटी आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार कोल्हे म्हणाले की, 370 कलम रद्द झाले म्हणून महाराष्ट्राचे व मावळचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतकरी आत्महत्या, युवकांना रोजगार, मावळचा पर्यटक विकास होणार नाही. मागील पाच वर्षात महाराष्ट्रात विकास करण्यात हे सरकार नापास झाले आहे. या सरकारचे दिवाळे काढल्याशिवाय महाराष्ट्रात दिवाळी साजरी होणार नाही अशा शब्दांत टीका केली.

सुनील शेळके म्हणाले, ‘मी मावळ तालुक्याच्या विकासाकरिता निवडणूक लढवत आहे, दहा वर्षापूर्वी ज्यांच्या विरोधात घोषणा दिल्या हे राष्ट्रवादीचे नेते आज माझ्या पाठीशी उभे आहेत. लोणावळ्याच्या नगराध्यक्षा नागरिकांना घरे पाडायची धमकी देत आहेत, ताई आठ दिवस काय करायचं ते करा नंतर नगरपरिषदेत तुम्हाला बसून देणार नाही. मी गडी बारीक आहे पण काय चीज आहे हे आता सर्वांना कळलं असेल. ज्यांनी मला पक्षातून बाहेर काढले त्यांना विधानसभेतून बाहेर काढा, हॅटट्रिक करायला ही टुर्नामेंट आहे का?’ अशी टिका राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर केली.

बाळासाहेब नेवाळे हा सर्वात स्वार्थी माणूस आहे, अशी टीका किरण गायकवाड यांनी केली.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like