Pimpri : पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाला बाजारभावाच्या दुप्पट बांधकाम दर दिल्याने निविदा रद्द करा

आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांची मागणी

एमपीसी  न्यूज – पंतप्रधान आवास योजनेच्या च-होली, रावेत व बो-हाडेवाडी प्रकल्पाला बाजारभावाच्या दुप्पट बांधकाम दर दिल्याने निविदा रद्द कराव्यात अशी मागणी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहराज्य नगर विकास मंत्री रणजित पाटील यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत शहरात घरे बांधण्यात येणार आहे. च-होली येथे 1 हजार 442 घरांसाठी 132 कोटी 50 लाख खर्च येणार आहे. याला प्रति स्केव्अर फूट दर 2 हजार 846 रुपये ठेकेदाराला देण्यात आला आहे. रावेत येथे 934 घरांसाठी 88 कोटी रुपये ठेकेदाराला दिले. त्याचा प्रती स्क्वेअर फूट दर 2 हजार 977 रुपये ठेकेदाराला देण्यात आला आहे व त्याचा प्रति स्क्वेअर फूट दर 2 हजार 977 रुपये दर देण्यात आला होता. बो-हाडेवाडीच्या प्रकल्पाबद्दल विरोधकांनी ओरड केल्यामुळे 2 हजार 500 रुपये प्रति स्केवअर फूट दर दिला गेला आहे.

आज पिंपरी-चिंचवड शहरात बांधकामाचा बाजारभावाप्रमाणे प्रति स्केवअर फूट दर 1 हजार 400 ते 1हजार 500 रुपये आहे. या दरामध्ये सर्वात उत्तम प्रकारे बांधकाम होऊ शकते. मात्र च-होली, रावेत व बो-हाडेवाडी प्रकल्पांना प्रति स्क्वेअर फुटापेक्षा जास्त दर दिला गेला आहे. त्यामुळे या तीन प्रकल्पात अंदाजे 150 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. गरीबांच्या घरांच्या नावाखाली स्वतःची घरे भरण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे या तीनही प्रकल्पाची चौकशी करुन च-होली, रावेत व बो-हाडेवाडी या तीन प्रकल्पांच्या निविदा रद्द करण्यात याव्या, असे निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.