Cancer – Annual Horoscope 2020-2021: कर्क राशीच्या व्यक्तींच्या व्यावसायिक प्रगतीचे वर्ष

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात कर्क राशीचे वार्षिक राशी भविष्य 2020-2021. कर्क राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!  

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार गेली 12 वर्षे आम्ही एमपीसी न्यूजसाठी वार्षिक राशी भविष्य लिहित आहोत. ज्योतिषशास्त्राच्या विविध अंगांचा विचार करून आम्ही वार्षिक राशी भविष्याचे लेखन केले आहे. प्रत्येक ग्रहाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो व प्रत्येक ग्रहाची गती कमी-जास्त असल्यामुळे आपण जास्त काळ एका राशीत राहणार्‍या ग्रहाचा परिणाम कसा होईल, त्यांचे विवेचन राशी व नक्षत्रानुसार केले आहे.

ग्रहांची मानसिकता शास्त्र व राशीप्रमाणे बदलते. काही ग्रह जगणे नकोसे करणारे वाटतात, परंतु तेथे ग्रह थोड्या कालावधीनंतर आनंद देणारे ठरतात. सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन हे कुटुंब, मित्र परिवार व नोकरी व्यवसाय यांनी व्यापलेले असते. यात काही शुभ घटना घडल्या की मनुष्य आनंदी होतो. परंतु अप्रिय घटना घडल्यास मनुष्य दु:खी होतो.

आम्ही वार्षिक़ राशी भविष्य लिहिताना प्रमुख अंगांचा जास्त विचार करून लिखाण केले आहे. तसेच उपासना ही या वर्षीच्या ग्रह गोचरीनुसार प्रत्येक राशीस सुचवली आहे. तसेच प्रत्येक राशीला शुभ रंग, भाग्य रत्न, शुभदिनांक व शुभकारक वयवर्षे आम्ही सुचविलेली आहेत. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेतल्यास आपले कार्य सिद्धीस जाईल, असे वाटते.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
केशवनगर, कासारवाडी, पुणे 411034.
मोबाईल – 9922311104.

(राशी  भविष्य पाहताना लग्न राशी, चंद्रराशी व रवि राशी यांचा विचार करावा. लग्न राशीवरून व्यक्तीमत्व विचारात घ्यावे. आरोग्यचा विचार करावा, चंद्र राशीवरून मानसिक सौख्य व रविराशी वरून नोकरी व्यवसाय व सामाजिक यांचा विचार करावा.)

कर्क : व्यवसायाच्या दृष्टीने प्रगतीकारक वर्ष

राशी चक्रातील ही चौथी रास असून जलतत्वाची स्त्री राशी आहे. या राशीवर चंद्राचे स्वामीत्व आहे. त्यामुळे त्या ग्रहाच्या गुणधर्मानुसार संवेदनशीलता संस्कारक्षम, सात्विक, शांत व एकांतप्रिय, लोकप्रिय, राजकारणाची आवड असते.

धर्मात्मा व चंद्र ग्रहाचा अंमल आपल्या राशीवर असल्यामुळे आपल्या स्वभावात चढ उतार हा आल्यास आपण व्यवहारी आहात. काटकसरीपणा आपल्यात आहे. संसार-प्रपंच यशस्वी होण्यासाठी लागणारे जे गुण असतात ते आपल्याकडे आहेत.

काल्पनिक विश्‍व, आपल्या भावनांचा आपल्या मनावर बसत असल्यामुळे ज्या प्रवाहाबरोबर असता त्या प्रवाहाशी जुळते घेता. आपले मन सतत अस्थिर चंचल असून या राशीचे चिन्ह खेकडा हे आहे. त्याप्रमाणे आपण एखाद्या ध्येयाला, विचाराला एकदा चिकटून राहण्याचा कल आपल्या स्वभावात आहे.

आपण सर्व पंथांच्या व्यक्तींना सामावून घेण्याचा कल असतो. जात, धर्म, पंथ हा विचार बाजूला ठेवून सर्व स्तराच्या व्यक्तींशी आपले मैत्रीपूर्वक संबंध असतात. आपण कधी कठोर अथवा कोमल हा गुण जाणवतो. आपल्या स्वभावात सात्विकता आहे.

आपण एखाद्या व्यक्तींची ने त्याची अथवा साधू संतांची मनोभावे पूजा अथवा निष्ठा ठेवून काम करता. आपली ग्रहणशक्ती व कल्पना शक्ती चांगली असून परिस्थितीशी आपण मिळते जुळते घेवून वेळ मारून नेता. त्यामुळे आपल्या गतीमान पद्धतीमुळे आपल्या व्यक्तीमत्वामध्ये एक भारदस्त वलय निर्माण होते.

आपणाकडे अफाट यश खेचून आणण्याची ताकद आहे. त्यामुळे आपण लोकप्रिय होत असता. कर्कराशीमध्ये , पुनर्वसू, व पुष्य  आणि आश्‍लेषा ही नक्षत्रे येत असतात.

कर्क रास, पुनर्वसू नक्षत्र असणार्‍या व्यक्तीचा स्वभाव ईश्‍वरावर श्रद्धा असणारा, स्वत:चे विचार मांडणारा धर्मशील, कायदे पंडित, यांचा आत्मविश्‍वास चांगला असतो. कर्करास पुष्य नक्षत्र असणार्‍या व्यक्तीचे पाठ करणारे, बुद्धीमान, भाऊ बहिणीमध्ये लाडका असणारा, राजप्रिय घरामध्ये एकत्र कुटुंबात राहणारा असतो.

कर्करास आश्‍लेषा नक्षत्रामध्ये ह्या नक्षत्राच्या व्यक्ती परिणामाची चिंता न करणाऱ्या, काही वेळा विश्‍वासू नसणाऱ्या, क्रोधी, कृतघ्न, धूर्त, अनेक भाषांचे ज्ञान असणारे वैभवाची इच्छा करणारे राजकारणी साहसी धूर्त, अभिमानी, स्वातंत्र्य प्रिय असतात.

अशा कर्क राशीच्या व्यक्तीचे चालू वर्ष कसे राहील ते पाहू…

राशीच्या सप्तम व अष्टम स्थानातून गुरुचे भ्रमण होणार असून पूर्वार्ध अनुकूल स्थितीमध्ये विशेषकरून भागिदारीतील घटनामध्ये शुभ राहील. कोर्टकचेरीमधील निर्णय मनासारखे होतील. स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी कालखंड उत्तम आहे.

नोकरीमध्ये बढती/प्रमोशन यासारख्या घटना घडतील. वाहन खरेदी अनेक लाभदायक घटऩा घडतील. उत्तरार्धात घराचे व्यवहार मनासारखे होतील. राजकीय/सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. निवडणुकीत यश मिळेल. महत्वाचे पद मिळेल.

वरिष्ठांचे घरापासून दूर अथवा परदेशी जाल, कुटुंबामध्ये सुखकारक घटना घडतील. मंगल कार्य घडतील. घर, जागा यांची कामे मार्गी लागतील. विद्यार्थी वर्गाला संघर्षातून यश मिळेल. मोठ्या कर्जाची कामे सहज होतील.

घरातील व कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. तर शनिचे भ्रमण आपल्या सप्तम स्थानातून होत  असून, आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कायदेशीर कामात यश मिळेल. भागीदारीमध्ये नवीन व्यवयास सुरु करण्यास उत्तम काळ राहील.

बराच काळ रखडलेले विवाह संपन्न होतील. अथवा जूळून येतील. जोडीदाराची साथ उत्तम राहील. आपणास स्वतंत्र व्यवासय केल्यास प्रगतीचा काळ राहील. जुन्या घराचे नूतनीकरण / नवीन घर अशामध्ये पैसे खर्च होतील.

पेन्शर / सेवानिवृत्त व्यक्तींना काळ शुभ आहे. मात्र एकटेपणाची जाणीव राहील. विद्यार्थी वर्गाला शेवटच्या क्षणी यश प्राप्त होईल. जुन्या आजाराचे प्रसंगाला तोंड द्यावे लागेल.

राशीच्या पंचम व लाभ स्थानातून राहू व केतूचे भ्रमण होत असून पुढील काळात कर्जाचा ताण कमी होईल. मोठे लाभ होतील. राजकीय व्यक्ती / सरकसरी व्यक्तीचे उत्तम सहकार्य मिळेल. शत्रूवर विजय मिळेल. खेळ/ स्पर्धा/ निवडणुका यामध्ये मोठे यश व आपला दबदबा निर्माण होईल. मोठी इच्छा पूर्ण होईल.

विद्यार्थी वर्गाला परीक्षेत अडथळे, त्रास संभवतो. पालकांस मुलांची चिंता दर्शविते. मुलांना शिक्षणासाठी दूर जावे लागेल. शेअर्स व्यवसायात फसवणूक अथवा नुकसान होईल.

हर्षलचे भ्रमण दशम / होत असून अचानक कामात बदल मोठा अधिकार दर्शवितो. प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल. मात्र काही सामूहिक किंवा संघटनेतील कामात त्रास सहन करावा लागेल. एकंदरीत हे वर्ष नोेकरी, व्यवसाय याच्या दृष्टीने प्रगतीचे व शिक्षण संततीच्या बाबत दक्षता व काळजी घेण्याचे राहील.

उपासना : आपण शिवशंकर, गणपती उपासना केल्यास उत्तम राहील. घरात रुद्र अभिषेक व शिवपाठस्तोत्र केल्यास उत्तम.

शुभ रंग : पांढरा, आकाशी.

शुभदिनांक : कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 29

भाग्यकारक वर्योवर्षे : 12, 16, 21, 31, 48, 59, 66.

Aries – Annual Horoscope 2020-2021: मेष राशीसाठी यशकारक वर्ष

Taurus – Annual Horoscope 2020-2021: वृषभ राशीच्या व्यक्तींची यशाकडे वाटचाल

Gemini – Annual Horoscope 2020-2021: मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत मोठे बदल

Cancer – Annual Horoscope 2020-2021: कर्क राशीच्या व्यक्तींच्या व्यावसायिक प्रगतीचे वर्ष

Leo – Annual Horoscope 2020-2021: सिंह राशीच्या व्यक्तींना शत्रूवर विजय, प्रवासाचा लाभ

Virgo – Annual Horoscope 2020-2021: कन्या राशीच्या व्यक्तींना पदवी- पुरस्कारांचा योग

Libra – Annual Horoscope 2020-2021: तूळ राशीच्या व्यक्तींची जागेची कामे होतील यशस्वी

Scorpio – Annual Horoscope 2020-2021: वृश्‍चिक राशीच्या व्यक्तींना राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेच्या पदांचा योग

Sagittarius – Annual Horoscope 2020-2021: धनु राशीच्या व्यक्तींना उत्तम धनसंचय व प्रसिद्धीची संधी

Capricorn – Annual Horoscope 2020-2021: मकर राशीच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये सकारात्मक बदल

Aquarius- Annual Horoscope 2020-2021: कुंभ राशीच्या व्यक्तींना यश निश्‍चित, पण संघर्षातूनच!

Pisces – Annual Horoscope 2020-2021: मीन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती व प्रतिष्ठा वाढवणारे वर्ष

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.