Pune : ‘सनबर्न फेस्टिवल’ रद्द करण्याची उत्सव समन्वय समितीची मागणी

एमपीसी न्युज- पुणे शहरात बावधन या ठिकाणी  29 ते 31 डिसेंबर या दरम्यान घेण्यात येणारा सनबर्न हा फेस्टिवल रद्द करावा अशी मागणी पुणे शहर दहीहंडी व गणेश उत्सव समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे .

पुणे शहरात दहीहंडी आणि गणेशोत्सवाला पोलीस व महाराष्ट्र शासन ध्वनिक्षेपणाबाबत जे निर्बंध घालून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करतात याचं  पार्श्वभूमीवर  आयोजकांवर गुन्हा दाखल केला जात नाही. तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सणांवर बंदी घालत 10 वाजता साउंड बंद केले जातात. मात्र सनबर्न फेस्टिव्हल चे साउंड रात्री 12 वाजेपर्यंत सुरू असतात ते बंद केले जात नाहीत .

गेल्या वर्षी दहशतवाद विरोध पथक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही संघटना सनबर्न फेस्टिव्हल मध्ये घातपात करण्याचा कट रचत आहे असे  दहशतवाद विरोध पथकच्या तपासात निष्पन्न झालेले असूनही अश्या संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या सनबर्नला सरकार परवानगी का देते ?असा सवाल समितीच्या वतीने करण्यात आला आहे .सनबर्न मुळे पाश्चात्य संस्कृतीच्या नशेच्या विळख्यात आत्ताची तरुणाई भरकटली जात आहे. अश्या सनबर्न फेस्टिवल ला परवानगी मिळू नये अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे .जर हा फेस्टिव्हल रद्द केला नाही तर याचे आयोजक हरविंदर सिंग यांच्या तोंडाला काळ फासू असा इशारा देखील समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.