Pimpri : बी.व्ही.जी. व ए.जी.इनव्हायरो इन्फ्रा कंपनीला थेट पद्धतीने दिलेला ठेका रद्द करून फेरनिविदा काढा – रमेश वाघेरे

एमपीसी न्यूज  –  बी.व्ही.जी. व ए.जी.इनव्हायरो इन्फ्रा कंपनीला थेट पद्धतीने दिलेला ठेका रद्द करून फेरनिविदा काढा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी केली आहे. 

घरोघरी कचरा गोळा करण्याकरिता निविदा काढण्यात आली होती. त्यामध्ये बी.व्ही.जी.कंपनी व ए.जी. इनव्हायरो इन्फ्रा कंपनीने टेंडर भरले होते. 1740 व 1780 प्रती टनास जास्त रेट असल्याने सामाजिक संघटना व राजकीय पुढा-यांनी  विरोध केल्यामुळे व कोर्टात केस टाकल्याने ही निविदा रद्द करण्यात आली होती. निविदा रद्द केल्यानंतर दोन्ही ठेकेदारांनी स्थायी समितीस पत्र देऊन प्रती टनास २१० रुपये प्रती टनास कमी करतो, असे पत्र देण्यात आले होते.

निविदा प्रक्रिया रद्द झाल्याने त्यांना पुन्हा ठेका देणे म्हणजे या प्रकरणात आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा संशय येत आहे. दोन्ही ठेकेदारास थेट पद्धतीने ठेका देण्यात आला आहे, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करून पुन्हा फेरनिविदा काढावी,  अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,  नवीन निविदा काढल्यानंतर 22 ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. त्यामुळेच या दोन ठेकेदारांनी रु.र.210 प्रती तन कमी केले आहे. त्यामुळे महापालिके 84 कोटी 51 लाख रुपये वाचणार आहेत. फेर निविदा काढल्यानंतर 22 ठेकेदार यापेक्षा हि कमी दर देवू शकतात. त्यामुळे  महापालिकेचे  व करदात्यांचे पैसे वाचणार आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करून पुन्हा  फेरनिविदा काढावी, अन्यथा आपणाविरोधात कोर्टात जावे लागेल. इशारा रमेश वाघेरे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.