Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी

भाजपला एकही पद न मिळाल्याने धक्का

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष मयुर ढोरे आणि महाआघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या पुढाकारातून मावळचे लोकनेते आमदार सुनील शेळके यांच्या विशेष प्रयत्नाने शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र आल्याने आज झालेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व विषय समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे या महविकासआघाडीचे उमेदवार निवडून आले तर भाजपला एकही सभापतीपद न मिळाल्याने धक्का बसला. गतवेळेस भाजपकडे ३ विषय समितींचे सभापतीपद होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मधूसुदन बर्गे व सहाय्यक निवडणूक अधिकारी मुख्याधिकारी सुवर्णा ओगले व नगराध्यक्ष मयूर ढोरे व उपनगराध्यक्ष राहुल ढोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडणुकीत सहापैकी चार विषय समितीच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या तर दोन विषय समितीच्या निवडणुकीसाठी मतदान झाले.

स्वछता वैधक व आरोग्य समितीच्या सभापतीच्या निवडणुकीत राजेंद्र कुडे यांनी भाजपाचे दशरथ केगले यांचा एक मताने पराभव केला. तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे चंद्रजित वाघमारे यांनी भाजपाचे किरण म्हाळसकर यांचा एक मताने पराभव केला. तसेच शिक्षण व क्रीडा सभापतीच्या निवडणुकीत मनसेच्या सायली म्हाळसकर यांच्या अर्जावर सूचक व अनुमोदक समान असल्याने भाजपाचे गटनेते दिनेश ढोरे यांनी हरकत घेतली होती. परंतु निवडणूक अधिकारी यांनी ती फेटाळल्याने सायली म्हाळसकर विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. निवडीनतंर फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक सुनील ढोरे, राजेश बाफणा, अमर चव्हाण, विशाल वहीले, शरद ढोरे, प्रविण ढोरे, आदी उपस्थित होते.

विषय समित्या सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे –

सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पुनम जाधव सदस्य माया चव्हाण, प्रमिला बाफणा, दिनेश ढोरे, दिलीप म्हाळसकर,
शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापती सायली म्हाळसकर, सदस्य- प्रमिला बाफणा, पूजा वहिले, अर्चना म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर पाणी पुरवठा व जल निस्सारण समिती सभापती राहुल ढोरे, सदस्य- माया चव्हाण, पूजा वहिले,अर्चणा म्हाळसकर, दिनेश ढोरे नियोजन व विकास समिती सभापतीपदी चंद्रजित वाघमारे सदस्य- माया चव्हाण, पूजा वहीले, किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे स्वछता वैधक व आरोग्य समिती सभापतीपदी राजेंद्र कुडे, सदस्य – प्रमिला बाफना, माया चव्हाण, दशरथ केंगले, अर्चणा म्हाळसकर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी शारदा ढोरे, सदस्य प्रमिला बाफना, माया चव्हाण, दीपाली मोरे, सुनिता भिलारे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.