Pune : विधानसभेसाठी राष्ट्रवादीने मागविले इच्छुकांचे अर्ज  

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने इच्छुकांकडून 1 जुलैपर्यंत अर्ज मागविले आहे. अर्ज सादर करताना खुलाप्रवर्गासाठी 5 हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी अडीच हजार रुपये धनादेशादारे जमा करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केले आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व 288 मतदार संघातील इच्छुकांनी उमेदवारी मिळण्यासाठी पक्षाकडे अर्ज करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. त्यानुसार शहराध्यक्ष तुपे यांनी शहरातील आठही विधाननसभा मतदार संघातील इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज शहर कार्यालयात जमा करण्याचे आवाहन केले आहे. आलेल्या अर्जाची 3 जुलै रोजी छाननी केली जाणार असून इच्छुक उमेदवारांची अंतिम यादी जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.

अर्जासोबत अनामत रक्कमेपोटी खुला प्रवर्गातील इच्छुकांनी 5 हजार आणि राखीव प्रवर्गातील इच्छुकांनी अडीच हजार रुपये धनादेश महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी या नावाने जोडावेत, असे आवाहनही तुपे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.