Pimpri : पिडीत मुलीला श्रध्दांजली वाहण्यासाठी पिंपरीत कॅंडल मार्च

एमपीसी न्यूज –  हिंजवडीतील संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना, कासारसाई येथे गेल्या पंधरवाड्यात उसतोड कामगारांच्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार केलेल्या नराधमांना फाशी झाली पाहिजे, तसेच उज्वल निकम यांसारख्या तज्ञ सरकारी वकीलाची नियुक्ती करुन हा खटला जलदगती न्यायालयात चालावा, याचबरोबर पिडीत कुटुंबियांना शासनाने लवकरात लवकर अर्थिक मदत द्यावी या मागण्यांसाठी   लोक जनशक्ती पक्षातील कार्यकर्ते एकत्र येत “कॅंडल मार्च’ आयोजित केला होता.

शनिवारी संध्याकाळी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत कॅंडल मार्चचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थितांनी घटनेचा निषेध करुन आरोपींना फाशीची मागणी केली. हुसैन खान, सचिन जाधव, नसीमभाई शेख, विनोद भालेराव, प्रवीण कांबळे, संदीप साळवे, अनिल वाघमारे, सचिन धेंडे , मनोज गायकवाड, अशोक कसबे, बाळा सावंत आदींचा सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.