Cannes Film Festival : अमृता फडणवीस दाखल झाल्या कान्स चित्रपट महोत्सवात

एमपीसी न्यूज – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या सोशल मिडीयावर कायमच सक्रीय आणि चर्चेत असतात. व्टिटरवरुन त्या नेहमी सामाजिक तसेच राजकीय मुद्द्यांवरुन आपलं मत मांडताना दिसतात.

 

राजकारणाबरोबरच अमृता फडणवीस यांना कलेची देखील आवड आहे.त्या स्वत: एक गायिका असून आतापर्यंत त्यांची बरीच गाणी रिलीज झाली आहेत.त्या आता कान्स चित्रपट महोत्सवासाठी पोहोचल्या आहेत.अमृता यांनी व्टिटरवरुन त्याची माहिती दिली आहे.कान्स चित्रपट महोत्सवासाठी पोहोचलेल्या फडणवीस यांचे हे व्टिट सध्या बरेच व्हायरल झाल आहे.त्यांनी स्वत:चे एक छायाचित्रही शेअर करुन या व्टिटमध्ये लिहिले आहे की,कान्समध्ये पोहोचले.कान्स चित्रपट महोत्सव 2022 साठी आणि बेटर वर्ल्डसाठी. अमृता यांच हे व्टिट आणि त्यांचा हा फोटो सोशल मिडीयावर खूप चर्चेत आहे.

 

दरम्यान आंतरराष्ट्रीय स्थरावर मानाचा मानला जाणारा कान्स चित्रपट महोत्सव 17 मे पासून सुरू झाला आहे. तो 28 मेपर्यंत चालू राहणार आहे.या महोत्सवात विविध कार्यक्रम देखील राबविले जाणार आहेत. तसेच सहा भारतीय चित्रपटांना कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मानाचं स्थान मिळालं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.