Pune : हॅन्डब्रेक न लावल्याने उतारावरून मागे आलेल्या कारची टेम्पोसह तीन दुचाकींना धडक

तीन महिलांसह व दोन लहान मुलांसह दहाजण जखमी

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला उभी केलेली कार हॅन्डब्रेक न लावल्याने उतारावरून मागे आल्यामुळे झालेल्या अपघातात तीन महिलांसह दहा जण जखमी झाले. ही घटना काल अप्पर कोंढवा रस्त्यावरील बस डेपो समोर घडली शनिवारी (दि. 15) संध्याकाळी सातच्या सुमारास अप्पर-कोंढवा रस्त्यावरील अप्पर बस डेपोजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबुंजकुमार सिन्हा (वय 40, रा. उंद्रि पिसोळी) हे आपल्या कुटुंबासह चारचाकी मधून गणपतीला हार घेण्यासाठी खाली उतरले तेव्हा त्यांनी आपल्या कारचा हॅन्डब्रेक न लावल्यामुळे त्यामुळे उताराच्या रस्त्यावरून मोटार निसटली व एक टेम्पो, पादचारी व तीन दुचाकी यांना धडक देत कार एका हार विकणाऱ्या महिलेच्या अंगावर गेली।तेथील नागरिकांनी हाताने कारला अडवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत काही दुचाकी स्वार व पादचारी जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी कारच्या मालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.