Moshi: कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

car accident in moshi two wheeler rider injured

एमपीसी न्यूज- कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना दि. 23 मे रोजी जुना जकात नका मोशी येथे घडली. याबाबत दि. 27 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळू नारायण कल्हाटकर असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पप्पू यशवंत कुटे (वय 32, रा. सोनवडी, कामशेत, ता. मावळ) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (एमएच 12 जीआर 0502) या कारच्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 23) दुपारी दोनच्या सुमारास बाळू कल्हाटकर हे दुचाकीवरून कामाला जात होते. ते रस्ता चुकले आणि मोशी येथील जुना जकात नाक्यावर पोहोचले. त्यावेळी समोरुन आलेल्या कारने बाळू यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात बाळू हे गंभीर जखमी झाले. याबाबत कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.