Wakad : चालकाने केला कारचा अपहार

एमपीसी न्यूज – वाकड येथून इंदौर येथे कार घेऊन येण्यासाठी चालकाच्या ताब्यात दिली. चालकाने इंदौर येथे कार न नेता तिचा अपहार केला. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

क्षितिज दिनेशकुमार तिवारी (वय 26, रा. कलाटेनगर, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संजय तुळशीराम अहिरे (रा. बुधवार पेठ, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय हा फिर्यादी क्षितिज यांच्याकडे कारचालक म्हणून काम करतो. 20 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास क्षितिज यांनी आपली कार (एम पी 09 / सी आर 6294) इंदौर येथे नेण्यासाठी आरोपी अहिरे याच्या ताब्यात दिली. मात्र, संजय याने कारचा परस्पर अपहार केला. तीन दिवस उलटून देखील त्याने कार इंदौरला नेली नाही. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.