Pashan : धावत्या गाडीने अचानक घेतला पेट; प्रसंगावधान राखल्याने जोडपे सुरक्षित

एमपीसी न्यूज – पाषाण तलावाजवळ एका धावत्या गाडीने पेट घेतल्याची घटना रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. मात्र, प्रसंगावधान राखून वेळीच गाडीतून उतरल्याने दोघेही पती-पत्नी सुरक्षित आहेत.

 

सुत्रांच्या माहितीनुसार, पिंपरीतील एक जोडपे आपल्या फोर्ड फिअस्टा गाडीने पुण्याच्या दिशेने येत होते. दरम्यान पाषाण तलावाजवळ त्यांच्या गाडीतून अचानक धूर निघू लागला. हे लक्षात येताच दोघेही तातडीने गाडीतून उतरले. त्यानंतर अल्पावधीतच संपूर्ण गाडीने पेट घेतला. घटनेत संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे.

अग्निशामक दलाला माहिती समजताच पाषाण केंद्रातून गाड्या रवाना झाल्या. आग विझवण्याचे काम सध्या सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.