Talegaon News : इंदोरी येथे इंद्रायणी नदीत कोसळली कार; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदोरी येथे इंद्रायणी नदीपात्रात एक कार पडली. ही घटना शुक्रवारी (दि. 27) मध्यरात्री घडली असून यात कारचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव संजय बोरसे (रा. मोहननगर, तळेगाव) असे आहे. बोरसे चाकण येथील एका खाजगी कंपनीत कामाला होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री बोरसे कंपनीतील काम संपल्यानंतर चाकणवरून तळेगावला घरी जात होते. दरम्यान, तळेगाव-चाकण रोडने जात असताना नदीपात्राच्या वळणावर त्यांचे नियंत्रण सुटले आणि कार थेट नदीच्या पुलावरून पाण्यात पडली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, तळेगाव एमआयडीसी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.