Dehuroad : हॉर्न वाजवल्यावरून तिघांनी मोडली कार चालकाची बरगडी

एमपीसी न्यूज – कार समोर कार उभी असल्याने कार चालकाने हॉर्न वाजवला. यावरून तीन जणांनी मिळून हॉर्न वाजवलेल्या कार चालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये कार चालकाची बरगडी मोडली. ही घटना देहूरोड येथे घडली.

जरनेल सिंग धरमसिंग बोपाराया (वय 39, रा. रावेत) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार उमेश अग्रवाल, अमित अग्रवाल आणि त्यांचा एक साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास जरनेल त्यांच्या सोसायटीमधून कार घेऊन जात होते. कार घेऊन जात असताना आरोपी यांची कार त्यांच्या कारसमोर होती. यामुळे जरनेल यांनी कारचा हॉर्न वाजवला. याचा राग मनात धरून आरोपींनी जरनेल यांना बेसबॉल व हाताने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या बरगडीला गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.