Hinjawadi : सेल्फ ड्राइव्हसाठी नेलेल्या कारचा अपहार

एमपीसी न्यूज – झूम कारच्या माध्यमातून सेल्फ ड्राइव्हसाठी नेलेली कार भाडेकरूने परत न करता नऊ लाखांचा अपहार केला आहे. हा प्रकार हिंजवडी येथे 19 डिसेंबर रोजी दुपारी साडेपाच वाजता घडला आहे. याप्रकरणी 5 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरखनाथ राजाराम मोरे (वय 33, रा. धावडे वस्ती, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शेख अब्दुल कादिर इमरान (वय 35, रा. बेंगलोर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख याने फिर्यादी यांची एम एच 14 / एच जी 6569 ही नऊ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार झूमकार या कंपनीमार्फत सेल्फ ड्राइव्ह साठी नेली. कार घेताना एक दिवसासाठी कार भाड्याने नेत असल्याचे आरोपीने सांगितले होते. मात्र, अनेक दिवस उलटले तरी तो कार घेऊन न आल्याने त्याच्यावर नऊ लाखांच्या अपहाराचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like