Career Guidance: छायाचित्रण क्षेत्रातील मोठ्या ‘रोजगार संधी’

देवदत्त फोटोग्राफी स्कूलचे सातव्या वर्षात यशस्वी पदार्पण, 30 बॅचेस पूर्ण! शेकडो छायाचित्रकारांना रोजगार!!!

एमपीसी न्यूज – छायाचित्रण हा केवळ छंदच नाही तर उत्तम व्यवसायही आहे. आपल्याला आनंदाबरोबरच रोजगाराच्या चांगल्या संधी या क्षेत्रात आहेत. आपलं फोटोग्राफीवर प्रेम असेल आणि या क्षेत्रात करियर करायची आपली मनोमन इच्छा असेल तर त्यासाठी आपण योग्य व्यावसायिक प्रशिक्षण घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. योग्य वेळी, योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेतलं तर आपणही नामवंत प्रोफेशनल फोटोग्राफर बनू शकता. नामवंत छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी चिंचवड येथे सुरू केलेल्या देवदत्त फोटोग्राफी स्कूलने सातव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले असून आतापर्यंत 30 बॅचेस पूर्ण केल्या आहेत. त्यातून शेकडो छायाचित्रकारांना रोजगारही मिळाला आहे. जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच या क्षेत्राविषयीची अधिक माहिती….
——————————————————————–

एकेकाळी छंद किंवा हौस म्हणून फोटोग्राफी या कलेकडे पाहिलं जायचं त्यात बदल होऊन आज संपूर्ण विश्वच फोटोग्राफीच्या प्रेमात पडलंय, यात सर्वात मोठा वाटा मोबाईल तंत्रज्ञानाचा आहे, तसेच कॅमेरा जगतातही प्रचंड मोठे तांत्रिक बदल झाले आहेत.

भारतात सामान्यपणे 2005 पासून डिजिटल DSLR  हा कॅमेरा प्रोफेशनल फोटोग्राफरमध्ये लोकप्रिय झाला. मोबाईलप्रमाणेच फोटो काढणे व तो शेअर करून आनंद द्विगुणित करणे सोपे झाले. याच कालावधीपासून जाहिरात कलेची अपरिहार्यता आणि त्यासाठी लागणारे कल्पक छायाचित्रण यांचे महत्व साऱ्या जगाच्या लक्षात आले आहे.

अगदी नेत्यापासून ते प्रॉडक्टपर्यंत व संकल्पनेपासून ते सर्व्हिसपर्यंत सर्वच ठिकाणी फोटोग्राफी आवश्यक झाली आहे. साहजिकच फोटोग्राफीचे शिक्षण घेण्याकडचा कल वाढला आहे व तशा लहान मोठ्या कोर्सची उपलब्धताही निर्माण झाली.

कलेची जाण असलेल्यासोबत अगदी दहावी-बारावीचे विद्यार्थी ते आयटी प्रोफेशनल्सपर्यंत सर्वच क्षेत्रांतून आज फोटोग्राफीमध्ये शिफ्ट होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.

प्री वेडिंग , वेडिंग

आयुष्यात सामान्यपणे एकदाच होणाऱ्या या सोहळ्यात आज टीमसह फोटोग्राफर उत्तम काम करताना दिसतात. प्रत्येक लग्नात आज सामान्यपणे किमान पन्नास हजार रुपये खर्च केले जातात. एका लग्नाचे फक्त फोटो- व्हिडीओचे पंचवीस लाख रुपये घेणारे फोटोग्राफरसुद्धा भारतामध्ये शेकडोंच्या संख्येने आहेत.

ग्लॅमर फोटोग्राफी

मॉडेलिंग क्षेत्रात, अभिनय क्षेत्रात, करियर करणाऱ्या सर्वच नवोदित व स्थापित कलाकारांना स्वतःचे सुंदर असे पोर्टफोलिओ बनवून घ्यावे लागतात, यासाठी मिळणारे मानधन चांगले असल्याने व चांगली प्रसिद्धी यात मिळत असल्याने इनडोअर व आऊटडोअर अशी फोटो सेशन आज मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत.

फूड , प्रॉडक्ट फोटोग्राफी

_MPC_DIR_MPU_II

कोणत्याही कंपनीच्या जाहिरातीकरिता या प्रकारच्या फोटोग्राफीची नीतांत गरज असते. मायक्रो लेन्सचा सुयोग्य वापर व लाइट सेटअपचे नीट नियोजन करून अतीव अप्रतिम असे रिझल्ट हे एका फोटोग्राफरला एका सॉफ्ट कॉपीमागे 5 हजार रुपयांपर्यंतची घसघशीत कमाई मिळवून देऊ शकतात. त्यामुळे कल्पक नियोजनातून चांगला आर्थिक मोबदला मिळू शकतो.

चाईल्ड व  मॅटर्निटी  फोटोग्राफी

आपल्या लहान सानुल्यांचे फोटो कायमस्वरूपी आपणासाठी आनंदाचा ठेवा असतो. त्यामुळे पॅकेजमध्ये याची कामे केली जातात. अगदी नवजात शिशुपासून आज फोटोसेशन करून घेतले जाते तसेच मॅटर्निटी फोटोग्राफीमध्ये आता मोठी पॅकेज दिली जातात. या दोन्ही प्रकारात किमान  आठ हजार रुपयांच्या पुढे मानधन घेतले जाते.

याव्यतिरिक्त ट्रॅव्हल, प्रोजेक्ट, पोर्ट्रेट, वाईल्ड लाईफ अशी अनेक फोटोग्राफीमधील क्षेत्रे आज फोटोग्राफर्ससाठी एका चांगल्या उत्पन्नाचे स्रोत बनत आहेत. अगदी थोड्या गुंतवणुकीमध्ये सुद्धा कलात्मक दृष्टीकोन व चिकाटी तसेच उत्तम सादरीकरण केल्यास एक चांगले उत्पन्न मिळवून देणारे हे क्षेत्र, अपरिमित असा निर्मितीचा आनंदही सोबत देते. हेच या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे.

–  देवदत्त कशाळीकर

( संचालक – देवदत्त फोटोग्राफी स्कूल, चिंचवड, पुणे)

देवदत्त फोटोग्राफी अँड स्कूल 
गावडे पेट्रोल पंपासमोर, लिंक रोड , चिंचवड
संपर्क – 9850600625 / 9822946329 / 9922501402

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.