Career Seminar : प्रशांत कहाणे यांच्या व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्सफूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – प्रशांत कहाणे यांच्या दोन दिवसीय व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मुसळवाडी कडूस, तालुका खेड या ठिकाणी हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पाडला. वेगवेगळे जिल्हे व शहरातून विद्यार्थी आणि नव व्यावसायिक या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.

‘व्यावसायिक प्रशिक्षण प्रबोधिनी’ या संस्थेने आयोजित केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रत्यक्षात यश कसे मिळवावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी प्रशिक्षणार्थी विद्यार्थांचे गुण जाणून घेऊन त्यांना विविध प्रकारची व्यावसायिक संधी निर्माण करुन देण्यात आली. व्यावसायिक व उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांमध्ये आंतरिक बदल घडवणे, त्यांना प्रोत्साहन देणे तसेच, माणूसकीची जाणीव करुन देणे हा या व्यावसायाचा मुळ उद्देश होता.

 पुढील प्रशिक्षण कार्यक्रम :
– शनिवार, रविवार ( 13 आणि 14 मार्च)
– वेळ – सकाळी 9 ते सायं. सात वाजेपर्यंत
– ठिकाण – ब्ल्यु बेल अॅग्री ट्यूरिझम रिसॉर्ट, मुसळवाडी कडुस, ता. खेड, जि. पुणे

काय शिकाल प्रशिक्षणात :
सेल्प डेव्हलपमेंट, करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास, योग्य आणि अयोग्य, आर्थिक व्यवस्थापन, व्यावसायिक कल्पना आणि मार्गदर्शन, निर्णय घेण्याची क्षमता व्यावसायासाठी आवश्यक गुण, समस्यांना कसे सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन केले जाते.

अधिक माहितीसाठी संपर्क – 7057842821

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.