Pune District Crime News : कमरेला पिस्तुल लावून फिरण्याची हौस पडली महागात

एमपीसी न्यूज : भरचौकात कमरेला पिस्तूल लावून फिरण्याची हाऊस 31 वर्षीय तरुणाला चांगलीच महागात पडली. खबर्‍याने दिलेल्या माहितीनंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या तरुणाला अटक केली. त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. गणेश उर्फ आबा बाबासो म्हस्के (वय 30 वर्षे, रा देऊळगाव राजे ता दौड जि पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. दौंड पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे काही कर्मचारी दौंड पोलिस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती देऊळगाव राजे येथील चौकामध्ये कमरेला पिस्तुल लावून उभा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस सापडलेे.

 

त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून तब्बल 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरोधात दौड पोलिस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुद्देमालासह पुढील तपासासाठी दौड पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.