Case Against Indurikar Maharaj : प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर येथे गुन्हा दाखल

Filed a case against famous kirtankar Indurikar Maharaj at Sangamner

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात महिलाबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपाखाली संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

याबाबत ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते असं, वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं.

इंदुरीकर महाराज यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यानुसार अहमदनगर येथील PCPNDT च्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीसही पाठवली होती. त्या नोटीसला इंदुरीकर महाराजांनी आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडत उत्तर दिलं होतं.

त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल, असंही म्हटले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.